पद गेलं, सोशल मीडियावरील पदं देखील बदलली.. !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

23 तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्र हातात घेतली. महाविकास आघाडीच्या चर्चांच्या सत्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झालेत. शपथ घेतल्यानंतर लगेचच फडणवीस आणि अजित पवार यांनी आपापल्या ट्विटरवर आपलं पद बदललं. मात्र अवघ्या तीन दिवसात या दोघांना आपली सोशल मीडियावर अपडेट केलेली पदं आता बदलली आहेत.

Image may contain: 5 people, people smiling

Image may contain: 1 person

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा  दिलाय. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने पुरेसं संख्याबळ नाही म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार अवघ्या ७८ तासात कोसळलं. दरम्यान पुढील मुख्यमंत्री जोपर्यंत शपथ घेत नाही, तो पर्यंत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.   

त्यामुळे लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी आपलं  ट्विटरवरचं पद आता बदललंय. आता देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असं पद नमूद करण्यात आल आहे. सोबतच तर अजित पवार यांनी देखील आपल्या नावासमोरील उपमुख्यमंत्री हे पद हटवत माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र असं लिहिलंय.  

आता महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या मोहर्यांनी आपली सोशल मीडियावरील पदं बदलल्याने चर्चा तर होणारच..  

Webtitle : devendra fadanavis and ajit pawar  updates their post on twitter

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis and ajit pawar updated their post on twitter