देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे..

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे..

महाराष्ट्रातील भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित यांना हाताशी धरून स्थापित सरकार कोसळलंय. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर संख्याबळ नसल्याचं कारण देत स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. यानंतर अवघ्या 78 तासात महाराष्ट्रातील सरकार आता कोसळलंय. 

दरम्यान याआधी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस.    

  • जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला
  • महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला, शिवसेनेपेक्षा भाजपला जनादेश मोठा होता 
  • न ठरलेल्य़ा गोष्टीचा शिवसेनेने बाऊ केला
  • जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले 
  • जनतेने भाजपला जनादेश दिला, कारण आम्ही 70 टक्के जागा जिंकलो, तर शिवसेना केवळ 40 टक्के जागांवर विजयी
  • शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असं कधीही ठरलं नव्हतं. न ठरलेल्या बाबींचा बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली 
  • महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता 
  • आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, आम्ही कुणाचे आमदार फोडणार नाही
  • मी राजीनामा देणार
  • शिवसेनेला लाचारी लखलाभ, भाजप जनतेचा आवाज बनून विरोधीपक्षाची भूमिका बजावेल
  • तीनचाकी सरकार वेगवेगळ्या दिशेने धावू लागल्यावर काय अवस्था होईल? 
  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवारांनी भेटून सांगितलं की काही कारणाने आम्ही आघाडीत राहू शकत नाही, त्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलेलं नाही,
  • भाजपने फोडाफोडी किंवा घोडाबाजार न करण्याचा निर्णय घेतला
  • शिवसेनेने स्वत:चं हसं करुन घेतलं
  • काही कारणामुळे मी युतीसोबत राहू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देत आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
  • त्यामुळे आमच्याकडेही बहुमत नाही.
  • पत्रकार परिषद संपल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे 

Webtitle : devendra fadanavis press conference before resigning from CM post a to z pointers of press conference

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com