देवेंद्र फडणवीसांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल झाली मोठी चूक...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मे 2020

सध्या विविध कारणांमुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनके कारणांमुळे चर्चेत आहे. एका बाजूला त्यांना ट्रोल केलं जातंय, दुसरीकडे त्यांच्या आणि राज्यपालांच्या भेटी. अशात आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक मोठा घोळ झाला

मुंबई - सध्या विविध कारणांमुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनके कारणांमुळे चर्चेत आहे. एका बाजूला त्यांना ट्रोल केलं जातंय, दुसरीकडे त्यांच्या आणि राज्यपालांच्या भेटी. अशात आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक मोठा घोळ झाला. छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करताना त्यांच्याकडून मोठी चूक झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना मोठा घोळ केला. 
 
सर्वांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केलं जातंय. विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकाळीच ट्विट केलं. यामध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांना 'सामाजिक कार्यकर्ते' म्हणून संबोधलं. देवेंद्र फडणवीस यांच्या अशा उल्लेखामुळे सोशल मीडियावर आणि महाराष्ट्रात मोठे पडसाद उमटताना पाहायला मिळाले. विशेषतः कोल्हापुरातून देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. 

Image may contain: 1 person, text that says "थोर सामाजिक कार्यकर्ते वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन!"

डेंजर प्रकार ! वडा पाव खा, कोरोना पळवा... मुंबईत काहीही होऊ शकतं !

दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया पाहून देवेंद्र फडणवीस यांनी झालेला घोळ पाहता हे ट्विट डीलीट देखील केलं. मात्र तोवर अनेकांनी त्यांच्या या ट्विटचे स्किन शॉट्स घेऊन ठेवले होते. ट्विट डिलीट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी केलेल्या ट्विटवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. यातच सकाळी झालेल्या घोळामुळे नेटकाऱ्यानी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधलाय. 

devendra fadanavis write improper words while praising chatrapati shahu maharaj 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis write improper words while praising chatrapati shahu maharaj