शिवसेनेच्या टोलेबाजीला फडणवीसांनी दिलं 'या' शब्दात प्रत्युत्तर

शिवसेनेच्या टोलेबाजीला फडणवीसांनी दिलं 'या' शब्दात प्रत्युत्तर

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस आणि त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे, अशा शब्दात सामनात टोलेबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या टोलेबाजीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक नाही. तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारवर टीकाही केलीय.


काल मुंबईत थोडे कमी म्हणजे 806 रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण नंतर कळले की मुंबईत काल केवळ 3300 चाचण्या झाल्या. अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
 



यावेळी फडणवीसांनी मुंबई महापालिकेच्या काराभारावर निशाणा साधला आहे. जनतेने जाऊन स्वत: चाचण्या कराव्या, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या प्रशासनानं करायला हव्या, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 



काय म्हटलं शिवसेनेच्या अग्रलेखात

चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस आणि त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे, अशा शब्दात सामनात टोलेबाजी करण्यात आली आहे.

सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?, असा सवालही उपस्थित सामनाच्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

devendra fadanvis shivsena saamana mumbai corona virsus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com