esakal | मुंबईतली मृत्यूसंख्या चिंताजनक, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतली मृत्यूसंख्या चिंताजनक, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. मुंबईत सातत्यानं कमी चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतोय. शिवाय, संसर्गाचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे.

मुंबईतली मृत्यूसंख्या चिंताजनक, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. 

मुंबईत सातत्यानं कमी चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतोय. शिवाय, संसर्गाचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी पत्रात म्हटलंय. 

वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मुंबईतील चाचण्यांची संख्या कमीच असल्याचं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे. यागोष्टी लक्ष वेधत फडणवीस म्हणाले की,  23 जुलै 2020 पर्यंत मुंबईत 4 लाख 62 हजार 221 चाचण्या झाल्या आहेत, तर 23 जुलैपर्यंत पुण्यात 3 लाख 54 हजार 729 चाचण्या झाल्या आहेत. अगदी 17 ते 23 जुलै या आठवड्याचा विचार केला तर 41 हजार 376 चाचण्या मुंबईत झाल्या आहेत. तर याच कालावधीतील पुण्याच्या चाचण्या 85 हजार 139 इतक्या आहेत, अशी माहिती फडणवीसांनी आपल्या पत्रात लिहिली आहे. 

हेही वाचाः नाहीतर तो प्रकल्प मी रद्द करेन, मुख्यमंत्र्यांकडून भाजपला मोठा हादरा

याची तुलना करत फडणवीस यांनी पत्रात पुढे लिहिलं की, मुंबईपेक्षा दुप्पट चाचण्या पुण्यात झाल्या आहेत. पुण्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईतील चाचण्या अतिशय कमी होत आहेत. 1 ते 23 जुलै या काळात मुंबईत 1 लाख 28 हजार 969 चाचण्या झाल्या आहेत. या 23 दिवसांची सरासरी काढली तरी ती 5607 इतकी येते.

कमी चाचण्यांमुळे मुंबईत मृत्यूदर जास्त 

मुंबईत कमी चाचण्या करणे हे मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्यासारखे होईल. याचा थेट परिणाम हा मृत्यूदरावर होतोय. पुण्याचा मृत्यूदर 2.39 टक्के असून, मुंबईचा मृत्यूदर हा 5.60 टक्के झालाय. महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर हा 3.68 टक्के असून मुंबईचा मृत्यूदर आटोक्यात न येण्याचे एकमात्र कारण हे कमी संख्येने होणार्‍या चाचण्या आहेत, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

अधिक वाचाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपचा हल्लाबोल

एकट्या मे महिन्यातील मुंबईतील मृत्यू पाहिले तर मे 2019 च्या तुलनेत मे 2020 मध्ये मुंबईत 5500 मृत्यू हे अधिकचे झाले आहेत. संसर्गाचे प्रमाण सातत्याने 20 ते 23 टक्क्यांच्या आसपास राहणे, ही चिंतेची बाब असून ते किमान 5 टक्क्यांच्या आसपास असावे, यासाठीचे नियोजन आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

पुण्यात चाचण्यांची संख्या वाढविली जाणे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्या प्रमाणात व्यवस्था राज्य सरकारतर्फे वाढवल्या जात नाही. आरोग्य व्यवस्था ही राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाब असून सुद्धा महापालिकांना पुरेशी मदत सरकारकडून देण्यात येत नाही आहे. चाचण्यांची संख्या वाढवत असताना पुरेशा व्यवस्था उभारल्या नाही, तर अडचणींमध्ये आणखी वाढ होणारेय. त्यामुळे एकीकृत विचार याबाबतीत करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Devendra Fadnavis letter sent uddhav thackeray

loading image
go to top