
Budget Session: "CM शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो"; फडणवीसांच्या कोटीवरुन पिकला हशा
मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी ज्यावेळी केंद्र सरकारनं सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय केला. तेव्हा तुम्ही जी चूक केली तीच चूक केंद्रातील विरोधकांनीही केली. त्यानंतर २०१९ मध्ये जेव्हा पूर्ण पीकं भुईसपाट झाली. त्यावेळी मात्र त्याची कारणं तुमच्या नेत्यांनी सांगितली की यांनी सहा हजार रुपये शेतकऱ्यांनी दिली त्याचा हा परिणाम झाला. (Devendra Fadnavis makes surroundings lighter and laughter in VidhanSabha taking name of CM Shinde)
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं पीक नष्ट झालेलं असतं तेव्हा पुन्हा पेरणीसाठी बियाणं घेण्यासाठी देखील शेतकऱ्याकडं काहीही नसतं तेव्हा हे सहा हजार रुपये त्याच्या कामी येतात. म्हणून सहा हजार रुपयांवर आम्ही सहा हजार रुपये दिले, त्यामुळं शेतकऱ्याला आता बारा हजार रुपये मिळतील. आम्ही ही सुरुवात केली आहे. मला वाटतं उद्याच्या काळात बारा हजार रुपयांत आणखी वाढ होऊ शकते.
जेव्हा तुमच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा त्यांनी ती सूचना मांडली होती. मी बघा कसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, लगेच ऐकतो, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. यानंतर काही काळ सभागृहात एकच हशा पिकला.
हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
थेट अनुदानामुळं विदर्भ, मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचं पाच लोकांचं कुटुंब असेल तर त्यांना केंद्राची शेतकरी सन्मान योजना, आपली नमो शेतकरी सन्मान योजना तसेच हे पैसे असे मिळून २१ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहेत, असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मर योजना, नदी जोड प्रकल्प, जलयुक्त शिवार २ सारखी योजना, जलजीवन मिशन आणि लेक लाडकी योजना याद्वारे शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प असल्याचं सभागृहात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं.