फडणवीसांवर पालघरची सारी मदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र शिवसेनेच्या गोटात गेल्यावर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना भाजपत आणून त्यांना उमेदवारी दिल्याने गावित यांच्या विजयाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या यशापयाशाला मुख्यमंत्री फडणवीस हे जबाबदार असतील, अशी चर्चा आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनांतर जाहीर झालेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमाच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना "मातोश्री'वर बोलावून शिवबंधन बांधत उमेदवारी दिल्यामुळे भाजपत खळबळ उडाली आहे. भाजपने बाजू सावरत कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात सामावून घेतले होते.
Web Title: devendra fadnavis palghar politics