बिहार विधानसभा निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, मानले मतदारांचे आभार

पूजा विचारे
Wednesday, 11 November 2020

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानलेत. हा विजय म्हणजे मोदींवरील विश्वास कायम असल्याचे संकेत असल्याचंही फडणवीस म्हणालेत. 

मुंबईः बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निकालाबाबत फडणवीस यांनी फेसबूक आणि ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. या दोन्ही पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानलेत. हा विजय म्हणजे मोदींवरील विश्वास कायम असल्याचे संकेत असल्याचंही फडणवीस म्हणालेत. 

फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, आम्हाला जंगलराज नको तर विकास हवा आहे, हे बिहारच्या जनतेने हे दाखवून दिलं. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला. त्यासोबतच नितीशकुमार यांच्यावरही विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी बिहारच्या जनतेला मी कोटी कोटी धन्यवाद देतो.

दरम्यान आपल्या फेसबूक पोस्टमध्ये फडणवीस म्हणालेत की, मी बिहारमधील भाजपाच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतो.संपूर्ण बिहारने करोना कालावधीमध्येही उत्साहाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला. या यशस्वी निवडणुकीसाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो. देशातील ११ राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे.  गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यातील आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो. या सर्व निवडणुकींमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे मार्गदर्शन केलं, जे कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.

धन्यवाद बिहार! बिहार कि जनता ने यह साफ कर दिया है की वे विकास चाहते है,ना की जंगलराज! हमारे जनप्रिय प्रधानमंत्री मा...

Posted by Devendra Fadnavis on Tuesday, November 10, 2020

बिहारमध्ये ऐन कोरोनाकाळात निवडणुका पार पडल्या. बिहार निवडणुकीदरम्यान फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे फडणवीस यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारमध्ये जाता आले नाही. 

Devendra Fadnavis reaction Bihar Assembly election result thanked voters


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis reaction Bihar Assembly election result thanked voters