सिद्धिविनायकाचा गाभारा झळाळला सोन्याच्या मुलाम्यानी..

सिद्धिविनायकाचा गाभारा झळाळला सोन्याच्या मुलाम्यानी..

मुंबई - मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर. जगभरातील श्रद्धाळू दरवर्षी मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात, सिद्धिविनायकाच्या चरणी लिन होतात. इथं येणारे भाविक आपापल्या ऐपतीप्रमाणे, इच्छेनुसार बाप्पा चरणी दान देखील देत असतात. अशाच एका भक्ताने सिद्धिविनायकाच्या चरणी तब्बल ३५  किलो सोनं दान केलंय. या सोन्यातून सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. गाभाऱ्याचे दार आणि घुमटाला सोन्याचा पत्रा लावण्यात आला आहे. हा सोन्याचा मुलामा चढवल्यामुळे मंदिर अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसू  लागलं आहे.

तब्बल २२० वर्ष जुनं असलेलं सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात श्रीमंत असलेलं मंदिर आहे. सिद्धिविनायकाच्या चरणी दर वर्षी तब्बल १० लाख लोकं  येत असतात. हे लोक आपल्या इच्छेप्रमाणे दान करत असतात. हे दान आणि हे पैसे मंदिर ट्रस्ट गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि अनाथ मुलांच्या संगोपनासाठी वापर करत असते. 

मोठी बातमी - भाडेकरूआणि घरमालकाच्या न्यायालयीन वादासंदर्भात मुंबई उच्च न्ययालयाचा मोठा निर्णय

येत्या काही दिवसांत माघ महिन्यातील गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे भक्तांची चांगलीच गर्दी सिद्धिविनायकाच्या चरणी होणार आहे . त्यातच या सोन्याच्या मुलामामुळे मंदिर अधिकच सुंदर आणि मनमोहक दिसू लागले आहे. आता मंदिराचे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी भाविकांची चांगलीच गर्दी बघायला मिळतेय. 

devotee donates 35 kg of gold at siddhivinayak temple mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com