बोर्डी : स्लॅब कोसळून पाच यात्रेकरु जखमी

अच्युत पाटील
रविवार, 1 एप्रिल 2018

आगर गावात केवडादेविचे प्रसिद्ध मंदिर असुन नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा असल्याने दरवर्षी चैत्र पौर्णिमेला यात्रा भरविली जाते.

बोर्डी : स्लॅब कोसळून पंचवीस यात्रेकरू गटारात पडले तर त्यातील पाच यात्रेकरु जखमी झाले आहेत. ही घटना डहाणू नगरपालिका क्षेत्रातील आगर गावात चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केवडादेवी यात्रेत शनिवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली.

आगर गावात केवडादेविचे प्रसिद्ध मंदिर असुन नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा असल्याने दरवर्षी चैत्र पौर्णिमेला यात्रा भरविली जाते.

सालाबाद प्रमाणे शनिवार पौर्णिमेच्या मुहूर्तावर होम झाल्यावर रात्री महाआरतीसाठी मोठ्या संख्येनेभाविक यात्रेत उपस्थित राहतात. शनिवारी रात्री पावणेदहा वाजता भाविकांची प्रचंड गर्दी झाली असतानाच अचानक मंदिराच्या शेजारी असलेल्या गटारीची स्लॅब कोसळल्याने पंचवीस यात्रेकरु गटारात पडले यापैकी पाच भाविकांना दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: devotee injured in Bordi

टॅग्स