'पुन्हा निवडणूक'मुळं गोंधळ; धनंजय मुंडेंची माफीची मागणी

'पुन्हा निवडणूक'मुळं गोंधळ; धनंजय मुंडेंची माफीची मागणी

मुंबई : मराठी कलाकारांनी आज ट्विटरवर 'पुन्हानिवडणूक' असा हॅशटॅग सुरू करून 'धुरळा' उडवून दिला. कलाकारांच्या या ट्विट मोहिमेमुळं नेतेमंडळींची भांबेरी उडाली. जवळपास सर्व टीव्ही चॅनेल्सवर या विषयावर चर्चा सुरू झाली. कलाकारांनी अशा पद्धतीचा टॅग सुरू करून महाराष्ट्राची फसवणूक केली, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला, असा आरोप होऊ लागला आहे. 

यावरून कलाकरांवर आरोप होऊ लागले आहेत. कलाकार भाजप धार्जिणे आहेत, असा आरोप होऊ लागला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट करून कलाकारांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. याबाबत मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

दरम्यान, मराठी कलाकारांनी केलेले ट्विट एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी असल्याचा खुलासा होऊ लागला आहे. तो सिनेमा नेमका कोणता? काय आहे या सिनेमाची कथा? सिनेमाची कथा निवडणुकांवर आधारीत कथानक आहे का?, असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रपुढं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com