धनंजय मुंडे लिलावती रुग्णालयात दाखल, ट्विट करुन दिली माहिती

पूजा विचारे
Tuesday, 10 November 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे सध्या मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबईः  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे सध्या मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.

दरम्यान त्यांना लिलावती रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळेल. यासंदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही.

धनंजय मुंडेंची कोरोनावरही मात 

जुन महिन्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी  मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतले होते. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.  त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर ते 14 दिवस घरातच क्वारंटाईन झाले आणि लगेचच कामात रुजू झाले.

Dhananjay Munde Lilavati admitted to hospital tweeted information


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Lilavati admitted to hospital tweeted information