तीन याचिकांवर उद्या सुनावणी

Court
Court
मुंबई - धनगर समाजाला अनुसूचित जमातीत (एसटी) समाविष्ट करून त्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण द्या, या मागणीसाठी प्रलंबित असलेल्या तीन याचिकांवर मंगळवारी (ता. 12) सुनावणी होणार आहे. राज्य सरकार याप्रकरणी काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबत वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत. परंतु प्रत्येक वेळी केवळ आश्‍वासने देण्यात आल्याने ही याचिका करण्यात आली. तीन वर्षांपासून ही याचिका सुनावणीसाठी प्रलंबित होती. केळकर समितीच्या शिफारशीनुसार आरक्षणात सूचित बदल करण्यात आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील काही भागांत धनगरांचा समावेश एसटी प्रवर्गात केलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com