धनंजय मुंडे प्रकरणी मोठी बातमी, रेणू शर्माच्या ट्विटमध्ये प्रताप सरनाईकांचा उल्लेख

सुमित बागुल
Thursday, 14 January 2021

आपल्या ट्विटमध्ये रेणू शर्मा म्हणतेय की, "माझ्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांनी मुद्दामून हे केलेलं आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा हेगडे यांच्या आरोपानंतर आता रेणू शर्माने मौन सोडलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवशी कृष्णा हेगडे यांच्याशी भेट झाल्याचं रेणू शर्मा यांनी  ट्विट करत म्हंटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रेणू शर्माने मौन सोडलं आहे. या ट्विटमध्ये रेणू शर्मा कृष्णा हेगडे यांना नेमकी कुठे भेटली याबाबत वाच्यता करण्यात आली आहे. 

धनंजय मुंडे प्रकरण : "व्हिडीओ उघड केलेत तर सर्वांची तोंडं बंद होतील", रेणू शर्माच्या वकिकांचा खळबळजनक दावा
 

महत्त्वाची बातमी : पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? जयंत पाटील यांची थेट प्रतिक्रिया

आपल्या ट्विटमध्ये रेणू शर्मा म्हणते की, "माझ्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांनी मुद्दामून हे केलेलं आहे. माझ्यावर जे हनी ट्रॅपचे आरोप केले जात आहेत, तशा कोणत्याही गोष्टींमध्ये मी सहभागी नाही. खरंतर आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत मी कृष्णा हेगडे यांना भेटले होते आणि त्यांनीच माझ्याशी बोलणं सुरु केलं. कृष्णा हेडगे यांनी केलेले आरोप खोटे बोगस आणि निराधार आहेत. ते माझी प्रतिमा मालिन करण्याचा आणि समाजात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंडे यांच्याविरोधात FIR  दाखल करण्यापासून माझे लक्ष विचलित करण्याचादेखील प्रयत्न केला जात आहे." 

या प्रकरणात धनंजय मुंडे यांची बाजू समोर आल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मावर हनी ट्रॅपमध्ये ओढण्याचे आरोप केले होते. 

dhanjay munde controversy renu sharma mentions pratap sarnaiks name in her tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhanjay munde controversy renu sharma mentions pratap sarnaiks name in her tweet