धानसर गावकऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुब्रा- पनवेल राष्ट्रीय महामार्गापासून दिड किलोमीटर आत असलेल्या धानसरमध्ये जाणाऱ्या क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खंड्याणमुळे अपघात होउन शुक्रवार (ता. 20) मारुती म्हात्रे या 36 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

नवीन पनवेल - पनवेल महापालिका हद्दीत समावीष्ठ धानसरमधील अंतर्गत रस्त्याच्या दयनीय अवस्था झाली आहे. दुरावस्था झालेल्या रसत्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भातील निवेदन धानसर ग्रामस्थांमार्फत बुधवार (ता. 25) आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आले. मुब्रा- पनवेल राष्ट्रीय महामार्गापासून दिड किलोमीटर आत असलेल्या धानसरमध्ये जाणाऱ्या क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खंड्याणमुळे अपघात होउन शुक्रवार (ता. 20) मारुती म्हात्रे या 36 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. महापालिकेतर्फे धानसर गावातील रस्त्याच्या दुरुस्तीकरता 47 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कामासाठी कोणत्याही कंत्राटदाराने निवीदा न भरल्याने गावातील रसत्याचे काम रखडले आहे. रखडलेल्या रसत्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे व ग्रामस्थांना होणार्या त्रासातुन मुक्त करावे या मागणीसाठी बुधवारी ग्रामस्थांनी पालिका कार्यालय गाठत निवेदन दिले.

ग्रामस्थांनी अनेकदा अर्ज करूनही धानसर मधील विकास कामे रखडली आहेत, धानसरमध्ये अनेक कंपन्यांची गोदामे आहेत.या गोदामानमधे रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणारी वाहने वाहतुक करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच ही अवजड वाहने गावातील क्षमता नसलेल्या पुलावरून सुद्धा नेली जात आहेत. 

सदर रस्त्यावरून गावातील शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ ये जा करत असतात. अवजड वाहने, रस्त्यांच्या अवस्थेमुळे येथील नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

आयुक्त गणेश देशमुख यांनी पुढील आठ दिवसात अनधिकृत रित्या होणाऱ्या कामांवर तसेच रस्त्यांच्या सुधारणेबाबत पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. - सुधाकर पाटील सरपंच

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Dhansar villagers met the Commissioner