धारावीत मुख्य वीज बॉक्‍सला आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

स्थानिकांत घबराट; काही वेळेतच आगीवर नियंत्रण

मुंबई : धारावीतील कृष्णन मेनन मार्गावरील साईबाबानगर येथील "बेस्ट'च्या वीज बॉक्‍सला रविवारी (ता. 28) दुपारी 12 च्या सुमारास अचानक आग लागली. या वेळी बॉक्‍समधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्याने स्थानिकांत घबराट निर्माण झाली. आग भडकू नये, याकरिता स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर "बेस्ट'च्या अधिकाऱ्यांनी बॉक्‍समधील सर्व फ्यूज काढून वीजप्रवाह बंद केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharavi Electric DP fire