धवलसिंह मोहिते यांची शिवसेनेतून हकालपट्टी

dhavalsinh mohite
dhavalsinh mohite

मुंबई - रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक वाढविलेले शिवसेनेचे उपनेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून मोहिते घराण्यातील दुसऱ्या फळीने त्यांच्या विरोधात निशाण फडकावले आहे. रणजितसिंह यांचे चुलतबंधू धवलसिंह यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. या वेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली.

सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ विजयसिंह मोहिते पाटील ज्या पक्षात असतात, त्याच्या विरोधात त्यांचे धाकटे बंधू प्रतापसिंह भूमिका घेतात, असा 1997 पासूनचा इतिहास आहे. विजयसिंह कॉंग्रेसमध्ये असताना प्रतापसिंह यांना भाजपने युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री केले होते. हाच वाद आता पुढच्या पिढीत दिसून येत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर धवलसिंह "राष्ट्रवादी'च्या जवळ गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com