ते मेले की नाही? तुम्हालाही जाळू

अनिश पाटील
शुक्रवार, 6 जुलै 2018

मुंबई - ‘‘प्रेते इथेच जाळा. ते मेले आहेत की नाही आम्हाला पाहू द्या, नाहीतर तुम्हाला तुमच्या गाड्यांसह या प्रेतांसोबत जाळून टाकू,’’ अशी धमकी राईनपाड्या (जि. धुळे)तील संतप्त जमावाने पोलिसांना दिली होती.

मुंबई - ‘‘प्रेते इथेच जाळा. ते मेले आहेत की नाही आम्हाला पाहू द्या, नाहीतर तुम्हाला तुमच्या गाड्यांसह या प्रेतांसोबत जाळून टाकू,’’ अशी धमकी राईनपाड्या (जि. धुळे)तील संतप्त जमावाने पोलिसांना दिली होती.

जमावाने पाच जणांना ठेचून मारल्यानंतर पोलिसांचे पथक प्रथम राईनपाडा पंचायत कार्यालयात पोहोचले. त्यांनाही जमावाने असे धमकावले. ‘सकाळ’कडील एफआयआरच्या प्रतीनुसार, काकरपाडा येथील विश्‍वास बागूल यांनी सकाळी ११ वाजता नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. राईनपाडा येथील आठवडा बाजाराजवळील पंचायत कार्यालयात पाच जणांना जमाव बेदम मारहाण करत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी मारहाण झालेल्या पाचही जणांची स्थिती नाजूक होती. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पोलिस सरसावले असता जमावाने रोखले. ते पाचही जण मेले आहेत, याची खात्री करण्यासाठी जमावाने पोलिसांना त्यांना तिथेच जाळण्यास सांगितल्याचे सहायक उपनिरीक्षक रवींद्र रणधीर यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

घटनाक्रम...
ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी जमावाचा पोलिसांवर हल्ला. 
उपनिरीक्षक योगेश खटकळ यांना बांबूचे फटके.
हवालदार विश्राम पवार, भूषण वाघ यांनाही मारहाण. 
पोलिसांची नियंत्रण कक्षाकडे मनुष्यबळाची मागणी. 
बळाचा वापर करून पाच जणांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले.

Web Title: dhule murder case The mob threatened the police

टॅग्स