कंगनाच्या प्रकरणावरुन दिया मिर्झानं संजय राऊतांकडे केली 'ही' मागणी

पूजा विचारे
Sunday, 6 September 2020

कंगनाला संजय राऊत यांनी हरामखोर मुलगी असं म्हटलं होतं. त्यानंतर या शब्दावरुन अनेकांनी आक्षेपही घेतला. संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री दिया मिर्झानं केली आहे.

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिनं आतापर्यंत बरेच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केल्यानं हा वाद चांगलाच पेटला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर सर्वत्र तिच्यावर टीका केली जात आहे. शिवसेनेनं राज्यभरात तिच्याविरोध आंदोलन देखील केलं आहे. तसंच कंगनाला संजय राऊत यांनी हरामखोर मुलगी असं म्हटलं होतं. त्यानंतर या शब्दावरुन अनेकांनी आक्षेपही घेतला.  राऊत यांनी अभिनेत्री माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री दिया मिर्झानं केली आहे. राऊत यांनी कंगनाला हरामखोर मुलगी म्हटल्या प्रकरणी दियानं ही मागणी केल्याचं समजतंय. दियानं एक ट्विट करत ही मागणी केलीय.

 

दिया हिनं ट्विटमध्ये लिहिलं की, संजय राऊत यांनी कंगनावर टिपण्णी करताना हरामखोर या शब्दाचा अत्यंत चुकीचा वापर केला. संजय राऊत सर कंगनानं जे वक्तव्य केलं. त्यावर नाराजी व्यक्त करणं किंवा त्यावर तुमचं मत मांडणं याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यासाठी अशा भाषेचा वापर करणं अयोग्य आहे त्यामुळे तुम्ही माफी मागावी. 

अधिक वाचाः  संजय राऊत कंगनाची माफी मागणार?, राऊतांनी केलं मोठं विधान

दरम्यान, जर कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याबद्दल विचार करेन, असं राऊत म्हणालेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचाः  संजय राऊतांनंतर 'हा' शिवसेना नेता संतापला, कंगनावर या शब्दात केली टीका

तसंच मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली तशीच हिंमत कंगनानं अहमदाबद्दल करावी, असा टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला आहे. कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली.

Dia Mirza Request Sanjay Raut apologise Kangana Ranaut using haramkhor language


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dia Mirza Request Sanjay Raut apologise Kangana Ranaut using haramkhor language