मुंबईत 12 ठिकाणी डायलिसिस केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पालिकेचा निर्णय; महिन्याला 10 हजार वेळा सुविधा उपलब्ध
मुंबई  - सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर मुंबई पालिकेने मुंबईत 12 ठिकाणी डायलिसिस केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी 119 डायलिसिस यंत्रे बसवण्यात येणार आहेत. त्याविषयीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या केंद्रांवर दर महिन्याला साधारण 10 हजार वेळा डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. रुग्णांना हा मोठा दिलासा ठरेल.

पालिकेचा निर्णय; महिन्याला 10 हजार वेळा सुविधा उपलब्ध
मुंबई  - सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर मुंबई पालिकेने मुंबईत 12 ठिकाणी डायलिसिस केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी 119 डायलिसिस यंत्रे बसवण्यात येणार आहेत. त्याविषयीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या केंद्रांवर दर महिन्याला साधारण 10 हजार वेळा डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. रुग्णांना हा मोठा दिलासा ठरेल.

पालिकेच्या मालकीच्या जागेवर सार्वजनिक आरोग्य खाते आणि मध्यवर्ती खरेदी खात्याच्या मदतीने ही डायलिसिस केंद्रे सुरू होतील. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार निवड झालेल्या संस्थांकडून लवकरच ही केंद्रे सुरू केली जातील. पालिकेने पाच वर्षांसाठी जागा देण्याचे ठरवले आहे. 12 ठिकाणी 119 डायलिसिस यंत्रे बसवली जातील. विमा कंपनीने ठरवलेले शुल्क आकारण्यास येथे परवानगी आहे. वैद्यकीय विमा असलेल्या रुग्णांची संख्या 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नसावी, असे बंधन घातले आहे. सरकारी विमा योजनांबाबत (महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजना) नियमांनुसार कार्यवाही करणे कंत्राटदारास बंधनकारक राहील, असे नियम पालिकेने तयार केले आहेत.

महिन्यातून 25 दिवस सेवा
डायलिसिस केंद्रांसाठी निवड झालेल्या संस्थांनी 12 ठिकाणी डायलिसिस यंत्रे बसवणे, त्यांची देखभाल करणे, आवश्‍यक मनुष्यबळ देणे, प्रत्येक महिन्याला 25 दिवस रुग्णांसाठी सेवा सुरू ठेवणे पालिकेने बंधनकारक केले आहे.

कमी शुल्क आकारणार
पालिकेच्या रुग्णालयांत डायलिसिससाठी 350 रुपये शुल्क आकारले जाते. त्यापेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नाही. यासाठी पालिकेने कमी शुल्क आकारण्यात आलेल्या निविदाधारकांची निवड केली आहे. सध्याच्या शुल्कापेक्षा कमी दरात ही सुविधा मिळेल. अंधेरीतील केंद्रासाठी निवड झालेल्या संस्थेने पालिकेच्या रुग्णालयापेक्षा 25 टक्के कमी शुल्कात ही सेवा देऊ केली आहे. दहिसर पूर्व येथील केंद्रांवर केवळ 51 रुपयांत डायलिसिस होईल.

या ठिकाणी सुविधा उपलब्ध
आरे कॉलनी, बोरिवली पश्‍चिम - कच्छी विसा ओसवाल जैन मानव संस्था
मोहिली गाव, साकीनाका जंक्‍शन - रहबर फाऊंडेशन
मन्नत इमारत, दहिसर गाव - शिवम हॉस्पिटल
सेंट जॉन अलाईड गृहनिर्माण संस्था, वांद्रे पश्‍चिम - विंग ह्युमन द सलमान खान फाऊंडेशन
वांद्रे गाव, बॅण्डस्टॅण्ड, वांद्रे पश्‍चिम - एकसग संजीवनी
हरियाली गाव, पवई - एकसग संजीवनी
ओशिवरा गाव, अंधेरी पश्‍चिम - एकसग संजीवनी
एक्‍सर गाव, बोरिवली पश्‍चिम - एकसग संजीवनी
व्ही. एन. देसाई रुग्णालय - रहबर फाऊंडेशन
क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालय, विक्रोळी - एकसग संजीवनी
मॉं हॉस्पिटल, चेंबूर - रहबर फाऊंडेशन
भाभा रुग्णालय, कुर्ला - रहबर फाऊंडेशन

Web Title: dialisis center in mumbai