रेसकोर्स अपघातप्रकरणी हिरे व्यापाऱ्याच्या मुलाला अटक 

रेसकोर्स अपघातप्रकरणी हिरे व्यापाऱ्याच्या मुलाला अटक 

मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सजवळ सोमवारी भरधाव मर्सिडीझ कारच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याच्या मुलाला अटक केली आहे.

चैतन्य अदानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हाजी अली मार्गावरील सिग्नल सुटल्यानंतर त्याची मर्सिडीझ मोटार अन्य मोटारीला ओव्हरटेक करून महालक्ष्मी स्थानकाच्या दिशेने जात होती. त्या वेळी अदानीचे नियंत्रण सुटले आणि त्याच्या कारने रस्त्यावरून चालत असलेल्या राजेंद्र कुमार यांना धडक दिली. या अपघातात अदानीची कार संरक्षक भिंत तोडून रेसकोर्समध्ये शिरली. ताडदेव पोलिसांनी त्याला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com