Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईत पडझड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

मुंबईमध्ये परवापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. कुठे जोरदार पावसामुळे झाड कोसळलंय, तर कुठे संरक्षक भिंत कोसळलीये. काही ठिकाणी जुन्या धोकादायक इमारती पडण्याच्या अवस्थेत आल्या आहेत.    

मुंबई : मुंबईमध्ये परवापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. कुठे जोरदार पावसामुळे झाड कोसळलंय, तर कुठे संरक्षक भिंत कोसळलीये. काही ठिकाणी जुन्या धोकादायक इमारती पडण्याच्या अवस्थेत आल्या आहेत.    

कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे रात्री 12 च्या सुमारास टाटा नगर येथील गोवंडी भीम सेवा संघ चाळीतील एक भिंत कोसळून दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पूर्व अंधेरीमधील मरोळच्या भवानी नगर येथे एक भिंत कोसळली. या भिंतीखाली उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या त्या ढिगाऱ्यात दबल्या गेल्या. त्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे. 

Image may contain: car, shoes, plant, outdoor and nature

कुर्ल्यात स्टेशन परिसरामध्ये संसार हॉटेलसमोर असलेली इमारत कोसळली. 'शकीना मंजिल' ही इमारत अतिधोकादायक होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Image may contain: one or more people and outdoor

सायन कोळीवाडा येथे आज सकाळी एक झाड कोसळले. त्या झाडाला लागून असलेला वीजेचा खांबही कोसळला. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले; पण जीवितहानी झालेली नाही. 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटात ही घटना घडली. या घटनेचा मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला.

Image may contain: outdoor, nature and water


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: different parts of Mumbai face damages due to Heavy rains