esakal | नवी मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकाचे काम संथगतीने; आणखी एक वर्ष करावी लागणार प्रतीक्षा!
sakal

बोलून बातमी शोधा

दिघा रेल्वे स्थानकाचे काम संथगतीने; आणखी एक वर्ष करावी लागणार प्रतीक्षा!

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे व ऐरोली रेल्वेस्थनकांच्या मध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे काम एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कार्पीरेशन) च्या माध्यामातून रेलकॉन इन्फ्रास्ट्रकचर या ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. या कामामध्ये येणारे अडथळे पाहता हे काम अजुन एका वर्षानंतर म्हणजे 2021 च्या मध्यापर्यंत पुर्ण होणार असल्याचे एमआरव्हीसीच्या अंभियत्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

नवी मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकाचे काम संथगतीने; आणखी एक वर्ष करावी लागणार प्रतीक्षा!

sakal_logo
By
शरद वागदरे

वाशी : ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे व ऐरोली रेल्वेस्थनकांच्या मध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे काम एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कार्पीरेशन) च्या माध्यामातून रेलकॉन इन्फ्रास्ट्रकचर या ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये प्रत्यक्ष या कामाला सुरुवात झाली आहे. तर 2020 मध्ये हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामामध्ये येणारे अडथळे पाहता हे काम अजुन एका वर्षानंतर म्हणजे 2021 च्या मध्यापर्यंत पुर्ण होणार असल्याचे एमआरव्हीसीच्या अंभियत्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ही बातमी वाचली का? चल जाऊ गौरी गणपतीच्या सणाला! एसटी बसेससाठी तब्बल 8 हजार चाकरमान्यांचे आरक्षण

दिघा रेल्वे स्थानकांचे कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमातून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून डिसेंबर 2016 मध्ये करण्यात आले, मात्र तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. त्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी म्हणजे 7 मे 2018 रोजी या प्रकल्पाला प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित जागेच्या ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आले. त्यांनतर या ठिकाणी दिघा रेल्वे स्थानकाचा फलक उभारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती. दिघा रेल्वे स्थानकांच्या आरखड्यामध्ये बदल करण्यात आला व निविदा प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे ऑक्‍टोबर 2018 मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. 111 कोटी रुपये खर्च करुन उभ्या करण्यात येणाजया दिघा रेल्वे स्थानकांचे काम सन 2020 पर्यत पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सध्या स्थितीमध्ये प्रस्तावित दिघा रेलवे स्थनकांच्या ठिकाणी असणारे झाडे, भुमिगत विद्युात वाहिन्या, महानगर गॅस वाहिन्या यांचा कामाचा अडथळा आला होता. या अडथळल्यांनतर देखील या ठिकाणी सबवे चे काम करणे बाकी असून या महिन्यांच्या अखेर पर्यत सबवे चे काम करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्यांची चौकशी करताय? वाचा ही महत्त्वाची बातमी...

दिघा रेल्वे स्थनकांचे काम संथगतीने सुरु असल्यामुळे या कामाला उशीर लागण्याची शक्‍यता असून एमआरव्हीसीकडून 18 महिन्यात काम पुर्ण होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता दिघा रेल्वे स्थानकांच्या कामात येणारे विघ्न पाहता प्रत्यक्षात दिघा रेल्वे स्थानकांचे काम हे सन 2021 पर्यत पुर्ण होण्याची माहिती एमआरव्हीसीच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. दिघा रेल्वे स्थानकांमुळे विटावा, गणपती पाडा, आनंद नगर, दिघा, विष्णुनगर येथील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. 

ही बातमी वाचली का? तब्बल एक हजार कोटींचा अवैध माल; नाव्हा शेव्हाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, कसं डोकं वापरलेलं वाचा

दिघा रेल्वे स्थानकांच्या कामामध्ये भुमिगत विद्युत वाहिन्या, झाडे हटवणे, महानगर गॅस वाहिन्या हटवणे आदी अडथळ्यांमुळे उशीर झाला आहे. 2021 च्या मध्यापर्यंत रेल्वे स्थानकांचे काम पुर्ण होणार आहे. रेल्वे स्थानकांचे बुकींग ऑफिस, शौचालय सुरक्षा भिंती बांधून पुर्ण आहे. या महिन्याच्या अखेरपासून सबवे बनवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. 
- अनिल पटके, जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास कार्पीरेशन

--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

loading image