शिवसेनेच्या दिलीप बारटक्के यांनी गुन्ह्यांची नोंद लपविली?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणात बंडखोर, असंतोष उमेदवारांचा उद्रेक झाला असतानाच आता काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गंभीर गुन्हे लपवून ठेवल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. सावरकर नगर प्रभाग क्रमांक 14 ड मधून निवडणूक वाढविणारे शिवसेनेचे उमेदवार दिलीप बारटक्के यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना त्यांनी हे गुन्हे निवडणूक आयोगापासून लपवून ठेवले असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामध्ये खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, बोगस शासकीय कागदपत्रे बनविणे, जमीन बळकावणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

जनतेसाठी स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार, अशी घोषणा शिवसेनेने केली होती; मात्र पक्षाची ही घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे. कारण ठाण्यातील सावरकर नगरात शिवसेनेकडून निवडणूक लढवीत असलेले बारटक्के यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शिवाय या नोंदी त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात न दाखविता लपवून ठेवल्या आहेत.

त्यामध्ये भादंवि. 307, 357, 359, 363, 367, 368, 364, 386, 387, 414, 464, 467, 470, 471, 504, 506, 146, 148, 149, 150, 34, बेकायदा शस्त्र आणि जमीन बळकावणे अशा गंभीर कलमांचा समावेश असल्याचा आरोप करत या प्रभागातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अमित सरैया यांनी केला आहे. या वेळी त्यांनी बारटक्के यांच्यावर उल्हासनगर न्यायालयात या गुन्ह्यांची सुनावणी सुरू असल्याची कागदपत्रे पत्रकारांसमोर दाखविली. तसेच अशा गंभीर गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी बारटक्के यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी करत त्याबाबतचे लेखी निवेदन प्रभाग निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे.

Web Title: Dilip Bartakke crime info hidden