सायरा बानो यांनी मोदींकडे मागितली मदत

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. भूमाफियांकडून मिळणाऱ्या धमक्यांविरोधात तक्रार करण्यासाठी सायरा बानो यांनी मोदींकडे ही विनंती केली आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याबाबत ट्विट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या विकासकामाच्या भूमिपूजनासाठी 18 डिसेंबरला मुंबईला येणार आहेत. त्यावेळी भेटण्याची वेळ द्यावी अशी विनंती सायराबानो यांनी केली आहे.  

सायरा बोनो यांनी आपल्या ट्विटमध्ये समीर मोजवानी नावाच्या व्यक्तिचा उल्लेख केला असून, ही व्यक्ती पैशांसाठी धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच्याविरोधात तक्रार केल्यानंतरही त्याला सोडण्यात आल्याचेही सायरा बानो ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. 

Web Title: Dilip Kumar’s wife Saira Banu seeks PM Modi’s help over ‘land mafia’ threats