दिलीप कुमार यांचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला बळकावण्याचा प्रयत्न एक बांधकाम व्यावसायिक करीत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी केली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करूनही अद्याप कारवाई न केल्याबद्दल त्यांनी ट्‌विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप असून, आपल्या जिवाला धोका आहे, असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "टॅग' केले आहे. आक्‍सा चौपाटी परिसरात सेठ मूलराज खटाव ट्रस्टच्या मालकीचा आठ हजार चौरस मीटरचा सुमारे 300 कोटी रुपये किमतीचा भूखंड आहे. हा भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप संबंधित बांधकाम व्यावसायिकावर आहे.

याप्रकरणी दियाकांत खटाव यांनी नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने 18 एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. जागा बळकावण्यासाठी मृत व्यक्तीच्याही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप तक्रारदाराने केला होता. पोलिसांनी या बांधकाम व्यावसायिकाला 26 एप्रिलला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

Web Title: Dilip Kumar Bunglow Crime Builder Saira Banu