दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सलीम खान यांना जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. चित्रपटसृष्टीतील बहुमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येईल.

मुंबई - या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पटकथा- संवाद लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. चित्रपटसृष्टीतील बहुमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येईल.

हा पुरस्कार सोहळा 24 एप्रिलला माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींना दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे दर वर्षी सन्मानित केले जाते. या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर यांनी "प्रभुकुंज' या निवासस्थानी केली.

साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वसंत आबाजी डहाके यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट नाटकाचा मोहन वाघ पुरस्कार भद्रकाली प्रॉडक्‍शन्सच्या "सोयरे सकळ' या नाटकाला देण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमाचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. भारतीय जवानांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या "भारत के वीर' या संस्थेसाठी सीआरपीएफचे महासंचालक विजयकुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Dinanath Mangeshkar Award Salim Khan