पडसलगीकर नवे पोलिस महासंचालक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मुंबई - दत्ता पडसलगीकर यांची पोलिस महासंचालकपदी; तर सुबोध जयस्वाल यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. शनिवारी दोघांनी पदभार स्वीकारला. दहशतवादासह सर्व गुन्ह्यांसाठी ‘बेसिक पोलिसिंग’ सारखेच असते. मुंबईच्या सुरक्षेसाठी केंद्रीय यंत्रणांशी समन्वय राखला जाईल, असे जयस्वाल यांनी नियुक्तीनंतर सांगितले. 

सतीश माथूर शनिवारी निवृत्त झाल्यानंतर पडसलगीकर यांच्याकडे महासंचालकपदाची धुरा देण्यात आली. ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेत प्रतिनियुक्तीवर असलेले जयस्वाल शनिवारी सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर आयुक्तपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. या वेळी त्यांनी पडसलगीकर यांच्याकडून आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मुंबईत बऱ्याच कालावधीकरिता काम केल्याने शहरासह नागरिकांच्या मानसिकतेची माहिती असल्याचे आणि राज्य सरकारने दाखवलेला विश्‍वास सार्थ करण्यावर अधिक भर देऊ, असे जयस्वाल म्हणाले. 

दरम्यान, माथूर सेवानिवृत्त झाल्यानंतर पडसलगीकर यांनी पदभार स्वीकारला. निवृत्तीनंतरही मुंबई व राज्याच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध आहोत, असे भावोद्‌गार या वेळी माथूर यांनी काढले.

Web Title: Director General of Police datta padsalgikar