माधवी जुवेकरसह सात जण बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - बेस्टच्या वडाळा आगारात गतवर्षी दसऱ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नोटांची उधळण करत नृत्य केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री माधवी जुवेकर हिच्यासह सात कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले. या कारवाईने उपक्रमात खळबळ उडाली आहे.

८ नोव्हेंबर २०१७ ला वडाळा आगारात माधवीसह सात कर्मचाऱ्यांनी नृत्य केले. कर्मचाऱ्यांनी माधवीवर नोटांची उधळण केली; तर तिनेही तोंडात नोटा घेऊन ओंगाळवणे नृत्य केल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून बेस्टवर टीकेचा भडिमार झाल्यावर तत्कालीन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी समितीने याचा अहवाल गेल्याच आठवड्यात महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांना सादर केला. त्यात जुवेकरसह सात जणांवर ठपका असल्याने त्यांना प्रशासनाने बडतर्फ केले. याच प्रकरणात अन्य पाच जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारस करण्यात आली. दरम्यान, माधवीसह इतरांना समज देता आली असती, असे मत पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले.

मी चुकीचे समर्थन करीत नाही; परंतु शिक्षा कमी झाली पाहिजे. हे सातही जण मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ही शिक्षा जास्त आहे. त्यामुळे ही शिक्षा कमी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
- आशिष चेंबूरकर, अध्यक्ष, बेस्ट समिती

Web Title: dirty-dancing Seven people including Madhavi Juvekar