बजाज फिनसर्व्हतर्फे सवलत मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

मुंबई : बजाज फायनान्स लिमिटेड या बजाज फिनसर्व्हच्या आघाडीच्या कर्ज आणि गुंतवणूक विभागाने तत्काळ कर्जपुरवठा आणि त्यावर विविध सवलतींची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअर्समध्ये एक हजारांहून अधिक आकर्षक सवलतींचा लाभ घेता येईल.

बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क देशभरातील ९० हजारांहून अधिक किरकोळ विक्रेत्यांकडून ईएमआय नेटवर्क कार्डचा वापर करून बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्कवर खरेदी करणाऱ्या ५० दशलक्षांहून अधिक ग्राहकांना या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेच्या माध्यमातून तत्काळ फायनान्सिंग पर्याय पुरवला जाणार आहे.

‘जस्ट ईएमआय’ मोहिमेत ग्राहकांना बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क कार्डवरून खरेदी करताना बिग बझार, बुक मायशो, पिझ्झा हट, बास्किन रॉबिन्स अशा अनेक ठिकाणचे वाऊचर्स जिंकता येतील. शिवाय, ग्राहकांना तीन हजारांपर्यंतचा कॅशबॅक आणि इतर अनेक सवलतींचा लाभ घेता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discount campaign by Bajaj Finserv