मतदानासाठी हॉटेलच्या बिलात सवलत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल व्यावसायिक बिलात सवलत देऊन जनजागृती करणार आहेत. "आहार' या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने आपल्या सदस्यांना मतदान करून येणाऱ्या ग्राहकांना सवलत देण्याचे आवाहन केले आहे. मतदात्यांनाच देण्यात येणारी ही सूट 5 टक्‍क्‍यांपासून पुढे कितीही असू शकते, अशी माहिती "आहार'चे सचिव संतोष शेट्टी यांनी दिली. लोणावळा, खंडाळा, माथेरान या थंड हवेच्या ठिकाणीही मतदान करून जाणाऱ्या पर्यटकांना तेथील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 15 ते 20 टक्के सूट मिळणार आहे.

Web Title: Discount hotel bill for voting