आज मुंबईत सागरी सुरक्षेवर चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या सागरी सुरक्षेबाबत मुंबईत चर्चा होणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे होणाऱ्या या परिषदेला संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गुजरात, गोवा राज्यासह अंदमान निकोबार, दमण दिव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासोबत उद्या चर्चा होणार आहे. सध्या दिवाळी आणि अन्य महत्त्वाचे सण तोंडावर असताना केंद्र सरकारने सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. या संदर्भात संबंधित राज्यांच्या सागरी सुरक्षेचा आढावा घेण्याबरोबरच उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच राज्यसरकार आणि अन्य राज्यांमध्ये अनेक आंतरराज्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

Web Title: discussion on mumbai sea security

टॅग्स