इतर विषयांची चर्चा, खड्डे पाहायचेच राहूनच गेले

Discussion of other subjects, remains to be seen in potholes
Discussion of other subjects, remains to be seen in potholes

कांदिवली : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवार दिनांक 31 जुलै 2018  रोजी 11 ते 1 च्या दरम्यान खड्डे पाहणीसाठी कांदिवली विभागाला भेट दिली. यामुळे रस्ते सफाई कर्मचारी, घन कचरा व्यवस्थापन अधिकारी पहाटे सहा पासूनच कर्मचारी खाकी वर्दी, अधिकारी ओळखपत्र लावून रस्त्यावर उतरले होते. यामुळे कांदिवली करांना आकुर्ली मार्ग, चक्रवर्ती मार्ग, एसव्ही रोड व इतर  मुख्य मार्ग चकाचक पाहायला मिळाले. मात्र कांदिवली द्रुतगती मार्ग, समता नगर मार्ग आणि इतर खड्डे असलेल्या मार्गापासून आयुक्तांना दूर ठेवण्यात आले. 

पालिकेच्या आयुक्तांनी खड्डे मुक्तीची डेड लाईन दिल्यानंतर 25 जुलै ला कांदिवली विभागातील खड्डे पाहणीसाठी येण्याचे निश्चित केले  होते. मात्र, मराठा मोर्चाचे आंदोलन सुरु असल्याने येऊ शकले नाही. सोमवारी आयुक्त खड्डे पाहणीसाठी येण्याचे निश्चित होताच, रविवारी सायंकाळपासूनच सर्व अधिकारी कामाला लागले होते. क्लीन अप कचरा गाडीवरील आणि झाडू मारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच खाकी वर्दी परिधान केली होती. रस्त्यावर पहाटे सहा पासूनच साफसफाई सुरु झाली होती. सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी पश्चिमेकडील कपोल विद्यालय व इतर ठिकाणचे लहान सहान खड्डे दाखविले. पूर्वेला उपायुक्त अशोक खैरे, सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आकुर्ली मार्गाहून, समतानगर मार्गाकडे महिंद्रा कंपनीतून जाणाऱ्या मार्गाचा नकाशा दाखविला, व मार्गाच्या कामाला गती मिळण्यासंबंधी चर्चा केली. मात्र समतानगर, ठाकूर मार्ग, द्रुतगती मार्ग, दत्ताजी साळवी मार्ग द्रुतगती मार्गाकडून आकुर्ली मार्गाकडे येणाऱ्या मार्गावर खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली आहे, हेच मार्ग आकुक्तांच्या नजरेआड केले. 

कांदिवली विभागातील असलेल्या खड्ड्यांपासून आयुक्तांना दूर ठेवल्याने, एकप्रकारे आयुक्तांची फसवणूक करण्यात आली असल्याचे नागरिकांसह वाहन चालकांकडून बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com