दिशाच्या शुभेच्छांचा 'बाण' कोणाकडे? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

तुषार सोनवणे
Sunday, 25 October 2020

अभिनेत्री दिशा पटानीचे दसऱ्याच्या शुभेच्छापर ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचे कारणही तसेच खास आहे.

मुंबई - दसऱ्याच्या शुभ दिवशी भारतीय लोक एकमेकांना शुभेच्छा देत असतात. सर्वच नागरिकांसह नेते, सेलिब्रेटी दसऱ्यांच्या शुभेच्छा देत आहेत. त्यात अभिनेत्री दिशा पटानीचे दसऱ्याच्या शुभेच्छापर ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचे कारणही तसेच खास आहे.

हेही वाचा - शिवसेनेचा आज दसरा मेळावा, मुख्यमंत्री कोणाकोणावर बाण चालवणार?

लॉकडाऊनला कंटाळलेले भारतीय दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. सर्व सेलिब्रेटी, नेते, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोरोनापासून संरक्षणासाठी सोशलमिडीयावरूनच दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत. परंतु महाराष्ट्रात अभिनेत्री दिशा पटानीचे दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचे कारणही खास आहे. दिशाने तिच्या ट्विटमध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा देताना शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासारखी प्रतिकृती वापरली आहे. त्या बाणाची दिशा देखील शिवसेनेच्या चिन्हासारखीच आहे. दिशाच्या ट्विटवर मराठी ट्विटरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. 

दिशाने केलेले ट्विट कसले संकेत देत आहे? असे अनेक नेटकरी विचारत आहेत. तसेच महाराष्ट्रातील बड्या नेत्यासोबत दिशाचे नाव अनेकवेळा जोडल्या गेल्याचे नेटकऱ्यांना माहित आहे.

हेही वाचा - चला आजपासून व्यायामाला करा सुरुवात; जिम, व्यायामशाळा सुरु

त्याअनुशंगाने दिशाच्या ट्विटवर मराठी नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील अनेक चर्चांना उधाण देणारे आहे. त्यामुळे दिशाचे ट्विट सध्या प्रचंड ट्रेंड होत आहे.

Discussions abound on social media about disha patani

----------------------------------

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussions abound on social media about disha patani