नवी मुंबईत किळसवाणा प्रकार, पाणीपुरीसाठी शौचालयातल्या अस्वच्छ पाण्याचा वापर

शरद वागदरे
Sunday, 29 November 2020

 ऐरोली सेक्टर 16 मधील वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्स च्या असणाऱ्या पाणीपुरी आणि ज्यूस कॉर्नरमध्ये शौचालयामधील असणाऱ्या नळांतील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार शनिवारी संध्याकाळी उघडकीस आला आहे. यामुळे ऐरोलीमधील नागरिकांनी संताप व्यक्त करत वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्सच्या व्यवस्थापकाला यांचा जाब विचारला आहे.

मुंबईः  ऐरोली सेक्टर 16 मधील वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्स च्या असणाऱ्या पाणीपुरी आणि ज्यूस कॉर्नरमध्ये शौचालयामधील असणाऱ्या नळांतील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार शनिवारी संध्याकाळी उघडकीस आला आहे. यामुळे ऐरोलीमधील नागरिकांनी संताप व्यक्त करत वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्सच्या व्यवस्थापकाला यांचा जाब विचारला आहे. तर संध्याकाळी स्नॅक्स कॉर्नरच्या बाहेर नागरिकांचा उद्रेक बघता शॉप बंद केला आहे.

ऐरोलीमध्ये वेलकम स्वीटस अ‍ॅण्ड स्नॅक्सच्या तीन शाखा आहे. त्यातील सेक्टर सोळा येथील शाखेमध्ये स्वीटस अ‍ॅण्ड स्नॅक्सच्या बाहेर असणाऱ्या पाणीपुरी आणि ज्यूस सेंटर उभारण्यात आले आहे.  ज्यूस सेंटर आणि पाणीपुरीमधील शौचालयामधील पाण्याचा वापर होत असल्याचे एका महिलेच्या बाब निर्दशनास आली. त्यानंतर ऐरोलीमधील नागरिकांनी वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्स कॉर्नर समोर उद्रेक करण्यास सुरुवात केली. यावेळी वेलकम स्वीटस अ‍ॅण्ड स्नॅक्सचे अवचर पटेल यांनी उपस्थित नागरिकांची माफी मागितली. 

अधिक वाचा-  ठाणे परिवहनचे टायर पंक्चरच, पाहणी दौऱ्यात 227 हून अधिक बसेस धूळ खात

नागरिकांच्या उद्रेकामुळे व्यवस्थापकांनी शॉप बंद केला आहे. यासंदर्भात ऐरोली विभाग आधिकारी मंगला माळवे खाडे आणि रबाले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

अधिक वाचा- 2 वर्षांपूर्वी धोकादायक घोषित केलेला 'आरे'मधला ब्रिजचा भाग कोसळला

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Disgusting type in Navi Mumbai use of unclean toilet water for Panipuri


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disgusting type in Navi Mumbai use of unclean toilet water for Panipuri