योगी सरकार तातडीने बरखास्त करा; काँग्रेसच्या नसीम खान यांची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 4 October 2020

योगी सरकार तातडीने बरखास्त करा. त्याशिवाय देशाच्या लोकशाहीवर घाला ठरणाऱ्या शक्तीचे समुळ उच्चाटन होणार नाही, अशी टीका माजी मंत्री काँग्रेस नेते नसीम यांनी केली.

मुंबई  :  उत्तर प्रदेशात  दिवसेंदिवस वाढत चाललेले अत्याचार हे योगी सरकारचे अपयश आहे. त्यामुळे योगी सरकार तातडीने बरखास्त करा. त्याशिवाय देशाच्या लोकशाहीवर घाला ठरणाऱ्या शक्तीचे समुळ उच्चाटन होणार नाही, अशी टीका माजी मंत्री काँग्रेस नेते नसीम यांनी केली.

क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव?

संसदेतील कामगार व शेतकरी विरोधी विधेयक, उत्तर प्रदेशातील दलित समाजातील मुलींवर वाढत असलेले अत्याचार आणि हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध करत नसीम खान यांनी  चांदिवली विधानसभा मतदारसंघात आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की केंद्रातील मोदी सरकार आणि उत्र प्रदेशातील  योगी सरकार  हे  लोकतंत्र व देशाचा कायदा मोडण्याचे काम करीत आहे. संसदेत मोदी सरकारने कामगार व शेतकरी विरोधी विधेयक सत्तेच्या जोरावर मंजूर करून घेतले. जे की ते कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. मोदी सरकारप्रमाणे उत्तर प्रदेशात योगी सरकारही दलित समाजावर वाढत असलेल्या अत्याचाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका नसीम खान यांनी केली.

क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव?

उत्तर प्रदेशातील हाथरस पीडित कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पायी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवणूक करून धक्काबुक्कीचा प्रकार म्हणजे कायद्याची पायमल्ली  आहे. मोदी आणि योगी सरकारचा निषेध करून, हे सरकार बरखास्त केल्याशिवाय देशाच्या लोकशाहीवरील संकट दूर जाणार नाही, असेही ते म्हणाले.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dismiss the yogi government immediately Demand of Naseem Khan of Congress