विधान परिषद बरखास्त करा - गोटे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - देशातील केवळ सहाच राज्यांत विधान परिषदेचे अस्तित्व आहे. विधान परिषदेस स्वत:चे घटनात्मक अधिकार नाहीत. केवळ राजकीय सोय म्हणून विधान परिषदेचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे.

मुंबई - देशातील केवळ सहाच राज्यांत विधान परिषदेचे अस्तित्व आहे. विधान परिषदेस स्वत:चे घटनात्मक अधिकार नाहीत. केवळ राजकीय सोय म्हणून विधान परिषदेचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे.

यामुळे मागील 3 ते 4 अधिवेशनांपासून विधान परिषदेत सरकारची कोंडी केली जात आहे. वास्तविक जबाबदारीचे भान राखून या सदनाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली पाहिजे. मात्र मूळ कल्पनेलाच हरताळ फासला जात आहे, अशी खंत आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त करीत विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी विधानसभेत केली. तालिका अध्यक्षांनी गोटे यांची मागणी फेटाळत ही मागणी कामकाजातून काढून टाकली. विधानसभेबाहेर गोटे यांनी पत्रक वाटून आपली मागणी माध्यमांसमोर मांडली. गोटे यांच्या मागणीचे विधान परिषदेत पडसाद उमटले.

Web Title: The dismissal of the Legislative Council