लालबागचा राजाच्या दरबारात पोलिस, कार्यकर्त्यांत वाद

Dispute between Police and activists of Lalbagh ganpati
Dispute between Police and activists of Lalbagh ganpati

मुंबई : लालबागचा राजाचे दर्शन परिचित व नातेवाइकांना घडवण्यासाठी स्टेजवर घुसण्याच्या प्रयत्नात असलेले या मंडळाचे कार्यकर्ते व त्यांच्या परिचितांनी मंगळवारी पोलिसांशी मोठा वाद घातला. याबाबत सीसीटीव्ही व इतर चित्रीकरणाची पडताळणी करून कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आपल्या नातेवाइकांना थेट स्टेजवर नेण्यासाठी मंडळाच्या या कार्यकर्त्यांनी मुखदर्शनाच्या बाजूला असलेल्या ठिकाणी गर्दी केली होती. त्यामुळे मुखदर्शनाला आलेल्या भाविकांना पुढे सरकण्यात अडचण येऊ लागली. त्या वेळी पोलिसांनी घुसखोरांना थांबवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने उपायुक्त अभिनाश कुमार यांनी हस्तक्षेप करून परिचितांना अडवून मागे जाण्यास सांगितले. भाविकांना होणारा त्रास; तसेच चेंगराचेंगरीची घटना टाळण्यासाठी पोलिसांनी मंडळाच्या नातेवाइकांना आत घेण्यास मज्जाव केला. 

माघारी जाणे काही नातेवाइकांना न रुचल्याने त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी आणखी वाद घातला. त्यांची समजूत काढून बाहेर काढण्यात आले. ही मोकळी जागा व्हीव्हीआयपींच्या दर्शनासाठी राखीव आहे. तेथून स्टेजवर घुसण्याचा प्रयत्न होत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com