कोरोना काळातील वादग्रस्त रुग्णालयाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

ऑक्सिजन अभावी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचा विनायक हॉस्पिटलवर ठपका आहे.
कोरोना काळातील वादग्रस्त रुग्णालयाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

नालासोपारा:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) ऑक्सिजन अभावी (shortage of oxygen) सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचा ठपका असणाऱ्या नालासोपा-यातील (nalasopara vinayak hospital) वादग्रस्त विनायक हॉस्पिटलचा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्या हस्ते सत्कार झाला असल्याचा एक फोटो समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 12 एप्रिल रोजी विनायक हॉस्पिटलमध्ये सात कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णांचा मृत्यू रुग्णालयाचा गलथान कारभार आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने संपूर्ण राज्यात एकाच खळबळ उडाली होती.

असे असतानाही या रुग्णालयाचा सर्वोत्कृष्ट सेवा देणारे रुग्णालय म्हणून त्यांचा सत्कार होणे हे सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे असा संतप्त प्रश्न उपस्थित करीत भाजपाचे वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी हा पुरस्कार तात्काळ परत घ्यावा अशी मागणी केली आहे.

कोरोना काळातील वादग्रस्त रुग्णालयाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
'पुढच्या वेळेस दाढी लावून येईन', मनसे आमदार राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

कोरोना काळात रुग्णांचा जीव घेणारे, वाढीव बिल देऊन रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारे रुग्णालय म्हणून नालासोपारा येथील विनायक हॉस्पिटलचे नाव सतत चर्चेत राहिले. 12 एप्रिल रोजी तर एकाच दिवसात सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी या रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते. हे सर्व मृत्यू हे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित न झाल्याने आणि रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारा मुळे झाले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यावरून पालिकेने एक समिती स्थापन करून, या रुग्णालयाची चौकशी ही केली होती.

कोरोना काळातील वादग्रस्त रुग्णालयाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
'प्रवासासाठी शिवपंख लावून द्या, लोक कामाला उडत येतील', मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

तर भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि वसई विरार मधील भाजपा पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन, या रुग्णालयावर तात्काळ कारवाही झाली पाहिजे अशी मागणी ही केली होती. पण हेच रुग्णालय कोरोना काळात सर्वोत्कृष्ट सेवा देणारे रुग्णालय म्हणून त्यांचा राज्यपाल आणि आरोग्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाल्याने पुन्हा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तर हा पुरस्कार तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी ही भाजपा वसई विरार शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केली आहे.

"जेव्हा घटना घडली तेव्हा आम्ही पालिकेची चौकशी नेमून रुग्णालयाची तपासणी केली होती. या चौकशीत 7 जणांचे मृत्यू हे ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे समोर आले आहे. जर ऑक्सिजन मुळे मृत्यू झाले असते, तर सर्वांचे एकाचवेळी मृत्यू झाले असते. पण असे न होता वेगवेगळ्या वेळेत हे मृत्यू झाले होते. त्याठिकाणी ऑक्सिजनचा साठा असल्याचेही आमच्या अहवालात समोर आले होते" असे वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी उपायुक्त किशोर गवस यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com