ठाण्यातील आरोग्यम हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

ठाणे : ठाणे पूर्वेकडील आरोग्यम हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हॉस्पिटल शेजारील साईनाथ नगर येथे राहणारे प्रकाश सहादु घाडगे (वय 54) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रविवारी मध्यरात्री आरोग्यममधील आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

याबाबत उपचार करणाऱ्या डॉ. अहमद या शिकाऊ डॉक्टरने नातेवाईकांना उशिरा कळवल्याने वाद उफाळला. रुग्ण प्रकाश यांची प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांचा मृत्यू ओढवल्याने नातेवाईक संतप्त झाले. डॉक्टरांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे नातलग आणि जमलेल्या शेकडोंच्या जमावाने आरोपांच्या फैरी झाडत रुग्णालयच बंद करण्याची मागणी केल्याने तणाव वाढला. तेव्हा, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहा.आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्यासह परिमंडळातील पोलीसांच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

अखेर, मृतदेह जे जे रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असुन हॉस्पिटलच्या व तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविरोधात कोपरी पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटेपर्यत सुरू होती.डॉक्टर श्रीमती गायकवाड यांचा हलगर्जीपणा असल्याचा नातेवाईकांचा आरोप

Web Title: disputes in arogyam hospital thane