दिवा, राम मंदिर स्थानकाचे प्रभूंच्या हस्ते रविवारी उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा व पश्‍चिम रेल्वेवरील नव्या राम मंदिर स्थानकाचे उद्‌घाटन रविवारी (ता. 18) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा व पश्‍चिम रेल्वेवरील नव्या राम मंदिर स्थानकाचे उद्‌घाटन रविवारी (ता. 18) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.

दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा मिळावा यासाठी मध्य रेल्वे व मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सप्टेंबर ते ऑक्‍टोबरदरम्यान चार जम्बो मेगाब्लॉक घेतले होते; मात्र फलाटाचे काम शिल्लक राहिल्याचे कारण पुढे करत दोन महिन्यांपासून या स्थानकातील जलद लोकलचा थांबा रखडला. तीच स्थिती पश्‍चिम रेल्वेवरील ओशिवरा परिसरातील राम मंदिर स्थानकाची झाली. राज्य सरकारने नामकरणाचा निर्णय उशिरा घेतल्याने 27 नोव्हेंबरला रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणारे उद्‌घाटन पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर रेल्वेमंत्र्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ न मिळाल्याने हे उद्‌घाटन रखडले; मात्र आता मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या विविध उद्‌घाटनासाठी रेल्वेमंत्र्यांना वेळ मिळाला आहे. रविवारी दादर स्थानकातील नवा फलाट, सात स्टेशनवर वाय-फाय व एका लांब पल्ल्याच्या गाडीला हिरवा कंदीलही रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते दाखवण्यात येणार आहे.

दिवा स्थानकात 12 लोकलला थांबा
18 डिसेंबरनंतर दिवा स्थानकात दोन्ही दिशेच्या प्रत्येकी 12 जलद लोकलला थांबा देण्यात येणार आहे. एकूण 24 फेऱ्या पहिल्या टप्प्यात दिवावासीयांना मिळतील. वेळापत्रकात नवीन वर्षांत बदल झाल्यावर आणखी फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

Web Title: diva, ram mandir station inauguration