यंदाच्या दिवाळीला महागाईची फोडणी

विविध वस्तूंच्या किमतीत महिनाभरात पंधरा टक्क्यांनी वाढ
Diwali Festival
Diwali Festivalsakal media

वडाळा : साखर, तेल, डाळी, कडधान्य, खोबरे, ड्रायफ्रूट्र्स यांच्यासह दीपावलीतील फराळासाठी (Diwali festival) लागणाऱ्या अन्य साहित्यांच्या किमतीत गेल्या महिनाभरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य माणसाचे (common people) मात्र या दिवाळीत दिवाळेच निघणार आहे. साखर, तेल यांचे आणि कांदा-बटाटा यांचे दर गेल्या महिनाभरात अधिकच वाढले (Grocery rates increases) आहेत. कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या जनतेला आता वाढत्या महागाईला (Inflation) तोंड द्यावे लागत आहे.

Diwali Festival
मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 429 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

‘वाढता वाढता वाढे ही महागाई’ अशी आता महागाईची व्याख्या झाली आहे. एकदा वाढलेले वस्तूंचे दर कमी होतच नसल्याने सर्वसामान्य जनता या महागाईच्या चक्रात पुरती पिसली जात आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर आता दिवाळी सण तोंडावर आला आहे. मात्र गेल्या महिनाभरात गणेशोत्सव सणात जीवनावश्यक वस्तूंचे दर होते त्या दरांपेक्षा दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कडधान्ये आणि डाळींचे दर गेल्या महिनाभरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. गणेशोत्सव काळात ९० ते ९५ रुपये किलो असणाऱ्या मूगडाळीने १२० ते १४० रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला आहे. तूरडाळ व मसूरडाळही दहा ते बारा रुपयांनी वाढली असून, सध्या बाजारात तूरडाळ ९० रुपये व मसूरडाळ ९० ते १०० रुपये प्रतिकिलो आहे. पिवळ्या मुगाच्या दरातही दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली असून, बाजारात सध्या ते १३० रुपये किलो आहेत. चणे, वाटाणे, चवळीच्या दरातही गेल्या महिनाभरात पाच ते आठ रुपयांची दरवाढ झाली आहे. दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेल्या पोहे, रवा, मैदा या वस्तूंच्या दरातही चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

Diwali Festival
रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आरोपी करणार का? हायकोर्टाचा सवाल

सध्या पोहे व रव्याचे दर हे प्रतिकिलो ३५ ते ४०, तर मैदा ३५ रुपये प्रतिकिलो आहे. खोबऱ्याच्या दराने उच्चांक गाठला असून, गणेशोत्सव काळात २२० रुपये किलो दराने असलेल्या खोबऱ्याने २५० चा टप्पा पार केला आहे. शेंगदाण्याच्या दरातही दहा ते बारा रुपयांची वाढ झाली असून सध्या शेंगदाणा ९० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. चणे, वाटाणे या कडधान्याच्या दरात तीन ते चार रुपयांची वाढ असून, सध्या चणे ९० ते १००, वाटाणे १४० ते १८० प्रतिकिलो आहेत. बेसन, कांदा, बटाटा, पिठीसाखर व साखर आणि खाद्यतेलाचे दरदेखील वाढले असून ३५ रुपये प्रतिकिलो मिळणारी साखर ५० रुपये किमतीत विकली जात आहे. कांदे ५० ते ६० व बटाटे ३० रुपये प्रतिकिलो आहेत. पिठीसाखर ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो आहे. मस्जिद, दाणा बंदर येथील बाजारपेठेतील हे दर असून वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळे दर आहेत.

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मालाची विक्री नाही. त्यात इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत दाखल होणाऱ्या किराणा मालाच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे."
- कौतिक दांडगे, अध्यक्ष, महाराष्ट्र बाजारपेठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com