esakal | संग्रही ठेवावा ‘सकाळ’चा दिवाळी अंक! प्रकाशन सोहळ्यात स्वप्नील जोशी यांचे कौतुकोद्‌गार 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रही ठेवावा ‘सकाळ’चा दिवाळी अंक! प्रकाशन सोहळ्यात स्वप्नील जोशी यांचे कौतुकोद्‌गार 

‘सकाळ’ नेहमीच वाचकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करतो आणि हा दिवाळी अंक याचा उत्तम नमुना आहे, असे कौतुकोद्‌गार प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांनी काढले.

संग्रही ठेवावा ‘सकाळ’चा दिवाळी अंक! प्रकाशन सोहळ्यात स्वप्नील जोशी यांचे कौतुकोद्‌गार 

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई ः ‘भविष्यकाळात दडलंय काय....’ अशी थीम घेऊन ‘सकाळ’ने काढलेला यंदाचा दिवाळी अंक खूप वाचनीय आणि सुंदर आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख, सुंदर छपाई आणि उत्कृष्ट मांडणी, यामुळे हा दिवाळी अंक संग्रही ठेवावा असाच आहे. ‘सकाळ’ नेहमीच वाचकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करतो आणि हा दिवाळी अंक याचा उत्तम नमुना आहे, असे कौतुकोद्‌गार प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांनी काढले.

कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न

स्वप्नील जोशी यांच्या घरी ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. या वेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक जयवंत चव्हाण, मनोरंजन विभागप्रमुख संतोष भिंगार्डे उपस्थित होते. या छोटेखानी सोहळ्यात स्वप्नील म्हणाले, ‘‘भविष्यकाळात दडलंय काय...?’ ही कल्पना मला खूप आवडली. त्याबाबत मान्यवरांनी लिहिलेले लेख वाचायला आणि समजून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. कोरोनाबाबतचे सगळे नियम पाळून हा प्रकाशन सोहळा झाला. सकाळ समूहाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.’’

हेही वाचा - लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्येही; निर्देशांकांचा सर्वकालिक उच्चांक

या अंकात पर्यावरण, कृषी, खाद्यसंस्कृती, मनोरंजन, तत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील पुढची परिस्थिती काय असेल, याविषयी मान्यवर लेखकांचे लेख आहेत. मुलाखत, विशेष लेख, परिसंवादांसह कथा, कवितांचाही या अंकात समावेश आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image