यंदा अमावास्येला दिवाळी पाडवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

ठाणे : या वर्षी आश्विन अमावास्येच्याच दिवशी दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा हा योग आल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यंदा कार्तिक शुक्‍ल प्रतिपदा क्षयतिथी आली आहे. जी तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाच्या वेळी नसते तिला ‘क्षयतिथी‘ म्हणतात. या वर्षी सोमवारी (ता.२८) सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी आश्विन अमावास्या संपल्यानंतर त्याच दिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करावयाचा असल्याचे सोमण यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी आश्विन अमावास्या संपल्यानंतर विरोधीकृत विक्रम संवत्‌ २०७६ व महावीर जैन संवत्‌ २५४६ चा प्रारंभ होत आहे. यापूर्वी सन २००५ मध्ये कार्तिक शुक्‍ल प्रतिपदा क्षयतिथी आली होती. आता सन २०२९ मध्येही पुन्हा अशीच कार्तिक शुक्‍ल प्रतिपदा क्षयतिथी येणार असल्याचे दा. कृ. सोमण म्हणाले.

या वर्षीच्या दिवाळीच्या मुहूर्तांविषयी माहिती देताना सोमण म्हणाले की, या वर्षी आश्विन कृष्ण द्वादशीच्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता.२५) प्रदोषकाली त्रयोदशी असल्याने गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी त्याच दिवशी साजरी करावयाची आहे. व्यापारी लोक श्रद्धेने शुभमुहूर्त पाहून नवीन वर्षीच्या हिशेबाच्या वह्या आणतात. या वर्षी शुक्रवारी (ता.२५) सकाळी ६.३७ पासून सकाळी १०.५५ वाजेपर्यंत, दुपारी १२.२१ ते १.४७ आणि सायंकाळी ४.३९ ते ६.०८ या मुहूर्तावर हिशेबाच्या वह्या आणाव्यात.

नरक चतुर्दशी व लक्ष्मीकुबेर पूजन रविवारी
या वर्षी रविवारी (ता. २७) चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी व त्याच दिवशी प्रदोषकाली आश्विन अमावस्या असल्याने रविवारी (ता. २७) नरक चतुर्दशी व लक्ष्मीकुबेर पूजन येत आहे. त्या दिवशी प्रदोषकाली सायंकाळी ६.०७ वाजेपासून रात्री ८.३७ वाजेपर्यंत लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे.

सोमवारी (ता.२८) सकाळी ९ वाजून ०८ मिनिटांनी आश्विन अमावास्या संपल्यावर बलिप्रतिपदेचा म्हणजेच दिवाळी पाडव्याचा सण साजरा करावयाचा आहे. त्याच दिवशी व्यापारी लोकांसाठी वही-लेखनाचा शुभमुहूर्त सकाळी ९.३१ ते १०.५६, दुपारी १.४८ ते ६.०७ वाजेपर्यंत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Padava to Amavas this time