छोट्या पडद्यावर दिवाळीची धूम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई - दर वर्षीप्रमाणे यंदाही छोट्या पडद्यावर दिवाळीचे सेलिब्रेशन दणक्‍यात होणार आहे. विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये कलाकार दिवाळी सेलिब्रेशन करताना दिसणार आहेत. दिवाळीनिमित्त मालिकांच्या विशेष भागाचे प्रसारणही करण्यात येणार आहे.

मुंबई - दर वर्षीप्रमाणे यंदाही छोट्या पडद्यावर दिवाळीचे सेलिब्रेशन दणक्‍यात होणार आहे. विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये कलाकार दिवाळी सेलिब्रेशन करताना दिसणार आहेत. दिवाळीनिमित्त मालिकांच्या विशेष भागाचे प्रसारणही करण्यात येणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील "कोण होईल मराठी करोडपती' कार्यक्रमात निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी सेटवर हजेरी लावली. या वेळी त्यांनी "नवक्षितिज' या सामाजिक संस्थेला सहा लाख चाळीस हजार रुपयांची मदत दिली. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पहिल्यांदा तिच्या भावासोबत म्हणजेच संदेश कुलकर्णीसोबत "कोण होईल मराठी करोडपती'च्या सेटवर भाऊबीज भागासाठी आली. हे दोघे "इच्छा माझी पुरी करा' या उपक्रमांतर्गत खेळले आणि त्यांनी कर्णबधिर पूजा व मिलिंद झवेरी यांना श्रवणयंत्राची मदत केली. हा दिवाळी विशेष भाग 31 ऑक्‍टोबर आणि 1 नोव्हेंबरला कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. ऍण्ड टीव्हीवरील सर्व कलाकार "इट्‌स दिवाली' शोमध्ये सेलिब्रेशन करणार आहे. अदिती गुप्ता, श्रीती झा, रुबीना दिलैक यांच्या दमदार परफॉर्मन्ससोबत खऱ्या आयुष्यातील जोडीदार ऋत्विक धनजानी व आशा नेगी आणि ऑन स्क्रीन जोडी शरद मल्होत्रा व क्रतिका सेन्गर यांच्या कव्वाली स्टाइल परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकून घेतले. "भाभीजी घर पर है' या मालिकेतील कलाकारांचे दमदार सादरीकरणाने या शोमध्ये रंगत आली. शनिवारी रात्री 8 वाजता हा शो ऍण्ड टीव्हीवर प्रसारित होणार आहे. झी टीव्हीवरील "संयुक्त' मालिकेतील कलाकारांनीही उत्साहात दिवाळी साजरी केली. सगळ्यांनी एकत्र येऊन फटाके उडवले, फराळावर ताव मारला आणि सेल्फीही काढल्या. याबाबत अभिनेता किरण कुमार म्हणाले, ""या वर्षी दिवाळी येण्यापूर्वीच मालिकेत दिवाळी साजरी केली. आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. खासगी आयुष्यात आपण दिवाळीत आपल्या नातेवाइकांना भेटतो. या मालिकेत ज्याप्रमाणे सगळे मिळून-मिसळून राहतात, त्याचप्रमाणे आपणही राहिले पाहिजे. दिवाळी असो किंवा अन्य सण वा उत्सव तो एकत्र साजरे करण्यातच खरी मजा असते.''

Web Title: Diwali in TV serials