शिवकुमारांना बंगळुरुला पाठवण्यासाठी जबरदस्तीने आणले विमानतळावर

शिवकुमारांना बंगळुरुला पाठवण्यासाठी जबरदस्तीने आणले विमानतळावर

मुंबई: कर्नाटकचे राजीनामानाट्य मुंबईत सुरु असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासोबत मुंबई काँग्रेसच्या काही नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी सोडून दिलं आहे. तर, डी के शिवकुमार यांना जबरदस्तीने बंगळुरुला पाठविण्यासाठी विमानतळावर घेऊन जाण्यात आले आहे.

डी के शिवकुमार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा आणि काही काँग्रेस नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या विश्रामगृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवकचे नेते हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या नाट्यानंतर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही प्रांगणात येण्यास मज्जाव केला जात होता. यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी विरोध केल्यावर सत्यजित तांबे आणि काही पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

यावेळी डी के शिवकुमार यांना विमानाने कर्नाटकात वापस पाठवण्याची तयारी मुंबई पोलिसांनी केली असल्याचेही सत्यजित तांबे यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे शिवकुमार यांना कर्नाटकात वापस पाठविण्यासाठी विमानतळावर नेण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com