आमदार निवास "हागणदारीमुक्त करा'!

आमदार निवास "हागणदारीमुक्त करा'!

मुंबई - अध्यक्ष महाराज, तुम्हाला विनंती करतो, काही पण करा पण आमदार निवास "हागणदारीमुक्त करा'! अशी आर्त स्वरांतील मागणी शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील आमदार हेमंत पाटील यांनी शनिवारी विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्यावरून ते सभागृहात बोलत होते.

पाटील यांनी आमदार निवासातील समस्यांचा पाढा वाचायला सुरवात केली. ते म्हणाले, 'या पवित्र सभागृहात आज काही आमदार अंघोळ न करता आले आहेत. कारण, आमदार निवासात पाणी आले नाही. समुद्राचा देखावा दिसावा म्हणून आम्ही समुद्राच्या बाजूकडल्या खोल्या भांडून घेतल्या; पण सकाळी आम्हाला काही जणांचे पार्श्‍वभाग पाहावे लागतात. त्यामुळे अध्यक्ष महाराज काहीही करा; पण आमदार निवास हागणदारीमुक्त करा !'' हेमंत पाटील यांच्या या मागणीवर सभगृहात एकच हशा पिकला. यावर अध्यक्षांनी 'तुम्ही तिकडे पाहू नये, अशी मिश्‍कील टिप्पणी करताच उपस्थित सदस्य खळाळून हसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com