घाबरु नका, निवडणुकीसाठी फंड मागणार नाही- राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

एक चांगला उद्योजक बना आणि मला भेटायला या. घाबरू नका मी तुम्हाला निवडणुकीसाठी फंड मागणार नाही. तुम्ही यशस्वी उद्योजक व्हा, हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे असे मत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मी उद्योजक होणार' या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, राज आणि शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी एकाच मंचावर उपस्थित होते.

मुंबई- एक चांगला उद्योजक बना आणि मला भेटायला या. घाबरू नका मी तुम्हाला निवडणुकीसाठी फंड मागणार नाही. तुम्ही यशस्वी उद्योजक व्हा, हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे असे मत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मी उद्योजक होणार' या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, राज आणि शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी एकाच मंचावर उपस्थित होते. 

तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले की, पुस्तकं वाचून उद्योग करता येत नाही. ज्यांनी काहीच केलं नाही ते आज पुस्तकं काढत फिरत आहेत. घाबरुन पुढे जाता येत नसतं. स्वप्नं पाहून ते पूर्ण करता येणं जास्त गरजेचे आहे. असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

तसेच, गुजराती माणूस हुशार असतो ते आता कळायला लागलं आहे. म्हणून मराठी माणूस पाठीमागे आहे हा भ्रम काढून टाका. मराठी माणूसही आता औद्योगिक क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रात पुढे जाणार आहे, असे म्हणून राज यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

Web Title: Do not be afraid, do not ask for funds for elections says Raj Thackrey