'लोकलमधून स्टंटबाजी करू नको'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबादेवी - कोणीही लोकलच्या प्रवासात स्टंटबाजी करू नका. माझा जीव सुदैवाने वाचला. आपल्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबाचा विचार करा. अपघातात मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते, 16 वर्षांचा आलम खान पोटतिडकीने सांगत होता. लोकलमध्ये स्टंट करताना पडलेल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओतील हाच तो मुलगा. रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आलम उपस्थित राहिला. त्याने स्टंटबाजी न करण्याचे आवाहन केले.

चर्नी रोड ते मरिन लाइन्सदरम्यान धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना एक मुलगा पोलच्या धडकेत खाली पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्याच्या मित्रानेच ही क्‍लिप तयार केली होती. रेल्वे पोलिसांनी या मुलाचा शोध घेण्यास सुरवात केली. यू-ट्यूब, व्हॉट्‌सऍप, फेसबुक आदी सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेत होता. पश्‍चिम रेल्वेचे पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चगेट रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी याप्रकरणी तपास केला आणि व्हिडिओ क्‍लिप व फेसबुकच्या माध्यमातून या मुलाचा शोध घेतला. त्यातून आलम खानचा थांग लागला. घरातूनच पोलिसांनी आलमला ताब्यात घेतले.

भारतीय रेल्वे कायद्यानुसार खटला दाखल करून त्याला बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.

रेल्वे पोलिसांचा प्रवासी सुरक्षा सप्ताहाचा समारोप सोहळा शनिवारी (ता. 3) चर्चगेट रेल्वे स्थानकात झाला. या सोहळ्यात आलम खान उपस्थित होता.

Web Title: Do not do a publicity stunt from the local