रक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना रक्तदाता मिळवून देण्याची सक्ती अनेक रुग्णालये करतात. हा प्रकार राष्ट्रीय रक्त धोरणाच्या विरोधात असल्याने तक्रारी आल्यास संबंधित सरकारी-खासगी रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) स्पष्ट केले आहे. 

रक्तपेढीत रक्ताचा पुरेसा साठा करून ठेवण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांची असते. त्यासाठी रक्तदान शिबिरेही भरवण्याचा पर्याय असतो. रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात रक्तदाता आणण्याची सक्ती करणे राष्ट्रीय रक्त धोरणाविरोधात आहे. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने हा इशारा दिला आहे. 

राज्यभरातील रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये किती साठा उपलब्ध आहे. रक्ताच्या बाटलीची किंमत काय, याची माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले होते. या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले. 

Web Title: Do not force the blood in exchange

टॅग्स